इस्लामिक कोट्स मराठी मधे | Islamic Quotes in Marathi by Ummat-e-Nabi.com
१. आपल्या आईवडिलांशी चांगले वागा. निश्चितच तुमची मुले देखील तुमच्याशी चांगले वागतील. [अल्लाह चे अंतिम पैगंबर मुहम्मद ﷺ] |
२. आपल्या पाहुण्या बरोबर जेवण करा, ज्यामुळे तो एकटा जेवायला लाजणार नाही. [अल्लाह चे अंतिम पैगंबर मुहम्मद ﷺ] |
३. आपसात समझोता घडवून आणणे सर्वोत्कृष्ट दान आहे. [अल्लाह चे अंतिम पैगंबर मुहम्मद ﷺ] |
४. अल्लाची कृपा आहे त्या व्यक्तीवर जो खरेदी व विक्री आणि आपले हक्क मिळवण्यासाठी नम्रतेने व्यवहार करतो. [अल्लाह चे अंतिम पैगंबर मुहम्मद ﷺ] |
५. अल्लाकडे सर्वात जास्त प्रिय तो व्यक्ती आहे जो त्याच्या दासांना जास्तीत जास्त फायदा आणि नफा पोहोचू शकतो. [अल्लाह चे अंतिम पैगंबर मुहम्मद ﷺ] |
६. अल्लाह पुढे सर्वश्रेष्ठ श्रद्धाळू तो आहे जो सूड घेण्याचे सामर्थ्य असून देखील शत्रूला माफ करून टाकतो. [अल्लाह चे अंतिम पैगंबर मुहम्मद ﷺ] |
७. अल्लाहचे भय बाळगा आणि आपल्या नातेवाईकांशी चांगलं वर्तन करत राहा. [अल्लाह चे अंतिम पैगंबर मुहम्मद ﷺ] |
८. असत्त्या पासून दूर राहा कारण असत्य गुन्ह्याकडे घेऊन जातो आणि गुन्हा नरकाकडे. [अल्लाह चे अंतिम पैगंबर मुहम्मद ﷺ] |
९. अश्लीलता आणि अशिष्ट वागणूक व्यक्तीला नष्ट करते. तर लज्जा आणि विनम्रता त्याचे सौंदर्य वाढवते. [अल्लाह चे अंतिम पैगंबर मुहम्मद ﷺ] |
१०. डोळ्यात अश्रू नसणे, हृदय कठोर असणे, विनाकारण मोठ्या अपेक्षा ठेवणे आणि जगाबद्दल अति हवस व लालसा ठेवणे या चार गोष्टी दुर्भाग्याची चिन्हे आहेत. [अल्लाह चे अंतिम पैगंबर मुहम्मद ﷺ] |
११. इजा पोहोचविणारी वस्तू रस्त्यापासून दूर करणे सुद्धा पुण्य कार्य आहे. [अल्लाह चे अंतिम पैगंबर मुहम्मद ﷺ] |
१२. जो कोणी सत्कर्म आणि कल्याणाचा मार्ग दाखवेल त्या व्यक्तीला देखील त्यावर अंमल करणाऱ्या सारख पुण्य मिळेल. [अल्लाह चे अंतिम पैगंबर मुहम्मद ﷺ] |
१३. जो व्यक्ती नम्र स्वभावा पासून वंचित असतो तो सर्व लाभापासून वंचित राहतो. [अल्लाह चे अंतिम पैगंबर मुहम्मद ﷺ] |
१४. जो व्यक्ती तुमच्यासोबत विश्वासघात करतो तुम्ही त्याच्यासोबत विश्वासघात करू नका. अर्थातच अल्लाह ला विश्वासघाती लोक अजिबात आवडत नाही. [अल्लाह चे अंतिम पैगंबर मुहम्मद ﷺ] |
१६. कोणत्याही बाबतीत सल्ला मागितल्यास विश्वासनियता बाळगून प्रामाणिक पणे सल्ला दया. [अल्लाह चे अंतिम पैगंबर मुहम्मद ﷺ] |
१७. मनुष्यासाठी तेच अन्न पवित्र आहे जे मेहनतीने व घाम गाळून मिळवली असेल. [अल्लाह चे अंतिम पैगंबर मुहम्मद ﷺ] |
१८. नातेवाईकांशी फटकून वागणारा जन्नत मध्ये कदापि प्रवेश होऊ शकत नाही. [अल्लाह चे अंतिम पैगंबर मुहम्मद ﷺ] |
१९. पूर्ण श्रद्धाळू ते लोक आहेत ज्यांची स्वभाव वृत्ती सर्वोत्तम आहे. [अल्लाह चे अंतिम पैगंबर मुहम्मद ﷺ] |
२०. तुम्ही कर्ज घेणे कमी करा जगण्याचा मुक्तपणे आनंद घेऊ शकाल. [अल्लाह चे अंतिम पैगंबर मुहम्मद ﷺ] |
२१. समाजात अनैतिक संबंध वाढल्यास गरिबी आणि लाचारी वाढते. [अल्लाह चे अंतिम पैगंबर मुहम्मद ﷺ] |
२३. स्वतःची चुकी असल्याची जाणीव असूनही जो माणूस भांडतो तो भांडत असेपर्यंत अल्लाच्या प्रकोपात असतो. [अल्लाह चे अंतिम पैगंबर मुहम्मद ﷺ] |
२४. तुम्ही दुसऱ्याच्या घरातील स्त्रिया पासून दूर राहा तुमच्या घरातील स्त्रिया देखील सुरक्षित राहतील. [अल्लाह चे अंतिम पैगंबर मुहम्मद ﷺ] |
२५. वाट चुकलेल्या व्यक्तीला मार्ग दाखवणे पुण्य कार्य आहे. [अल्लाह चे अंतिम पैगंबर मुहम्मद ﷺ] |
२६. कंजूषपणा आणि पैसे उडविण्यापासून बचाव करून खर्च करणे अर्धी कमाई आहे. [अल्लाह चे अंतिम पैगंबर मुहम्मद ﷺ] |
Comments
Post a Comment